Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड अभिनेत्री दिपिका पादुकोणच्या वडिलांना कोरोनाची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा संसर्ग वाढताना दिसतोय. आतापर्यंत कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. दिवसागणिक कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होतेय. हळूहळू या विषाणूचा विळखा बॉलिवूडच्या गळ्यापर्यंत पोहोचलेला दिसत आहे. आतापर्यंत अनेक कलाकार या विळख्यात सापडले असून, काहींची सुटका झाली तर काहींना आपण गमावले. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. मात्र याबाबत दिपीकाने माहिती दिलेली नाही.

दिपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे माजी बॅडमिंटनपटू आहेत. इतकेच नव्हे तर फिटनेसच्या बाबतीत ते अतिशय कट्टर आहेत. मात्र तरीही कोरोनाच्या विळख्यात ते सापडले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजताच त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि उपचार घेत आहेत. दिपिकाच्या आई उज्ज्वला पादुकोण आणि बहीण अनिशा पादुकोण यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर येत आहे.

याबाबत अद्याप दिपिकाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याची माहिती मिळत आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत असून औषधांना योग्य प्रतिसाद देत आहेत. असे सांगितले जात आहे की, त्यांच्या तब्येतीत होत असलेली सुधारणा पाहता त्यांना लवकर डिस्चार्ज दिला जाईल.

आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंब देखील सामील होते. तर अक्षय कुमार, गोविंदा, कॅटरिना कैफ, रणधीर कपूर अश्या अनेक कलाकारांचा या यादीत समावेश आहे. यातील बऱ्याच कलाकारांनी कोरोनावर मात केली असून आता कोरोना बाधितांसाठी आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहेत.