हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने दिल्लीचेही दार ठोठावले आहे. सोमवारी दिल्लीत आणखी एका व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. इतकेच नाही तर तेलंगणातही एक प्रकरण समोर आले आहे. अशाप्रकारे, कोरोनाव्हायरसची पाऊले भारतात देखील पडली आहेत आणि सोशल मीडियावर जोरदार गदारोळ माजला आहे. बॉलिवूडसह अनेक नामांकित सेलिब्रिटींनी यावर ट्वीट करण्यास सुरवात केली आहे. बिग बॉसची माजी स्पर्धक आणि सलमान खानच्या दबंग २ मध्ये दिसणारी डॉली बिंद्रा सतत कोरोनव्हायरसबद्दल ट्विट करत असते आणि सर्व सीमा बंद करण्याचे सुचवले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री डॉली बिंद्रा यांनी कोरोनाव्हायरसविषयी ट्विट केले आहे की, ‘सर्व सीमा बंद केल्या पाहिजेत. प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे, त्याबद्दल भारताने गंभीरतेने विचार करायला हवा. भारतीय आरोग्य मंत्रालयाला संबोधित करताना त्यांनी हे ट्विट केले आहे. डॉली बिंद्रा यांचे हे ट्विट बरेच वाचले जात आहे.
Uses of m95 mask is the one to be used not the plain one avoid public places #CoronaVirusUpdate #coronavirus
— Dolly D Bindra (@DollyBindra) March 2, 2020
डॉली बिंद्राने कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी मास्क घालण्याची शिफारस केली आहे. तिने लिहिले: ‘एम ९५ मास्क वापरा. प्लेन वाला मास्क वापरू नका. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. असं वाटतं की कोरोनाव्हायरसच्या भारतात आल्याच्या बातमीने डॉली बिंद्रा खूप अस्वस्थ झाली आहे आणि सर्वांना ती टाळण्याचा सल्ला देत आहे. आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे की, ”सीओवीआईडी-१९” संसर्गाचे एक प्रकरण दिल्लीहून आणि एक तेलंगणातून समोर आले आहे. दिल्लीचा रुग्ण इटलीला गेला, तर तेलंगणाच्या रुग्णाने यापूर्वी दुबईचा प्रवास केला होता.