Take a fresh look at your lifestyle.

बाॅलिवुड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अपयशी; मृत्यूच्या काही मिनिटं आधी लिहिली ‘ही’ भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूडमधूनच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौक्से हीने जगाला निरोप दिला आहे. दिव्या चौक्से यांना बर्याच दिवसांपासून कर्करोगाचा त्रास होता. दिव्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मृत्यूच्या काही मिनिटं अधी एक भावनिक पोस्ट लोहिली आहे. दिव्याच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.

दिव्याने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, “मी जे सांगणार आहे, त्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. शब्द भरपूर असले तरी ते कमी आहेत. मला गायब होऊन कित्येक महिने झाले आणि खूप मेसेज आले. आता या वेळेला मी तुम्हाला सांगते मी माझ्या मृत्यूशय्येवर आहे. मी खूप मजबूत आहे, त्या आयुष्यासाठी जिथं संघर्ष नाही. कृपया काहीही प्रश्न विचारू नका. तुम्ही माझ्यासाठी काय आहात, हे फक्त देवालाच माहिती आहे”

https://www.instagram.com/p/CCjcdodpJ-X/?utm_source=ig_web_copy_link

2011 साली दिव्या मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झाली होती. 2016 साली तिने दिल तो आवारा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. 2018 साली दिव्याने पटियाले दी क्वीन हे पहिलं गाणं गायलं. यानंतर ती कित्येक दिवस कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली.