जेनेलियाने शेअर केला रितेश सोबतचा रोमँटिक व्हिडीओ ; म्हणाली की…
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया यांची जोडी बॉलीवूड मधील बेस्ट कपल म्हणून ओळखली जाते. रितेश आणि जेनेलिया नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात आणि आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतेच जेनेलियाने दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात दाद दिली आहे.
जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तेरा बन जाऊंगा’ हे गाण सुरू आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘फॉरेवर वाला लव्ह’ अशा आशयाच कॅप्शन जेनेलियाने दिलं आहे. हा व्हिडीओ ३ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला असून चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून कमेंट आणि लाइकचा पाऊस पाडला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’