Take a fresh look at your lifestyle.

जया बच्चन यांचं फिल्मी दुनियेत कमबॅक; ‘या’ मराठी सिनेमात करणार काम

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) ह्या बर्‍याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. जया बच्चन यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपटविश्वात आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. काही काळ पडद्यावरून विश्रांती घेतल्यानंतर आता त्या पुन्हा चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहेत. विशेष म्हणजे जया बच्चन एका मराठी सिनेमातून कमबॅक करणार आहेत

जया बच्चन पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करणार आहेत. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. अवघ्या २० दिवसांत चित्रीत होणाऱ्या या मराठी चित्रपटात जया बच्चन कोणत्या भूमिकेत दिसतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असणार याबद्दल दुमत नाही.

दरम्यान, गजेंद्र आपल्या चित्रपटातील वेगळेपणामुळे ओळखले जातात. विषयांचं वेगळेपण, मांडणीची पद्धत, कलात्मक चित्रीकरण ही त्यांच्या शैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता जया यांच्या वाट्याला गजेंद्र यांच्या जादुई बटव्यातून कोणती भूमिका येते हे पाहण्यासाठी मराठी रसिकप्रेक्षकांसोबत संपूर्ण चित्रपटसृष्टी उत्सुक असणार हे मात्र नक्की!!

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.