Take a fresh look at your lifestyle.

Happy Birthday मिसेस सिंघम; पावर लेडी काजोलचा 48’वा वाढदिवस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल हे कपलं बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय कपलं आहे. सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्याबद्दल बोललं जात.

आज आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या काजोलचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा येत आहेत. अशातच तिचा पती आणि अभिनेता अजय देवगण मागे कसा राहणार..?म्हणूनच त्याने तिला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत ज्या चर्चेत आहेत.

अजय देवगणच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत काजोलला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला काजोलचा इनकमिंग कॉल दिसत आहे. फोन उचलल्यानंतर अचानक समोर काजोलचे फोटो येतात.

या फोटोंमध्ये काजोलने लाल रंगाचा वन पिस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. ‘जेव्हा तिचा फोन येतो तेव्हा मी कधीच उचलायला चुकत नाही. काजोल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन अजय देवगण याने यावेळी दिले आहे.

दरम्यान, या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अजयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीदेखील भन्नाट कमेंट केल्याचे दिसत आहेत. अनेकांनी अजयची फिरकीसुद्धा घेतली आहे. या पोस्टवर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘सर जी, याला बायकोची भीती म्हणतात’.

दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ‘होय कारण जर तुम्ही फोन उचलला नाही तर तुमची बायको रागावेल. आज अभिनेत्री काजोल आपला ४८ वा वाढदिवस साजरा करते आहे. पण तरीही डीडीएलजे मध्ये ती जितकी सुंदर दिसायची तितकीच आजही दिसते. त्यामुळे मॅडमची फॅनफॉलोईंग आजही तगडी आहे.

काजोलला पावर लेडी म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखलं जात. कारण बेधडक बोलणे तिच्या व्यक्तीमत्वाचा भाग आहे. शिवाय जिचा पती सिंघम आहे ती स्वतः लेडी सिंघम नसेल का..? आजचा दिवस काजोल इतकाच तिचा पती अजय लेक इनाया आणि तिचे चाहते असा अनेकांसाठी खास आहे.

काजोलच्या लक्षात राहणाऱ्या चित्रपटांपैकी दिलवाले दुल्हनिया लेके जायेंगे, प्यार किया तो डरना क्या, इष्क, फनाह, राजू चाचा असे अनेक चित्रपट आजही तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहतात. नव्वदीच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये काजोलचा समावेश आहे. आजही काजोलचा चाहता वर्ग काही कमी झालेला नाही हे विशेष.