Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडच्या शिरपेचात मानाचा तुरा; अभिनेत्री कंगना रनौतसह, गायक अदनान सामींना पद्मश्री पुरस्काराचा सन्मान

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आज राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा झाला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान अभिनेत्री कंगना रनौत आणि प्रसिद्ध गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्काराने तर बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांना पद्मभूषण, मुष्टीयोद्धा मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सोहळ्यात कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. एकूण ११९ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला असून यात १४१ जणांना पद्मपुरस्कार जाहीर झाले असून, काहींना संयुक्तपणे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. तर ७ जणांना पद्म विभुषण, १६ जणांना पद्म भूषण आणि ११८ जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले आहेत. या पुरस्कार विजेत्यांमध्ये ३४ महिलांचाही समावेश आहे.

दरम्यान जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, गायक एसपी बाला सुब्रमण्यम, ओडिशाचे प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन साहू, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ नरिंदर सिंग, कर्नाटकचे प्रख्यात ह्रदयरोगजतज्ज्ञ बेल्ले मोनाप्पा हेगडे, भारतीय इस्लामिक विद्वान आणि कार्यकर्ते मौलाना वहिदुद्दीन खान, पुरातत्वशास्त्रज्ञ बीबी लाल, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. एकूण १० जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.