Take a fresh look at your lifestyle.

बाॅलिवूडमध्ये श्रीदेवीनंतर मीच… ; कंगनाने केली श्रीदेवी सोबत स्वतःची तुलना

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. कंगना नेहमीच आपल्या रोखठोख भूमिकेमुळे चर्चेत असते. तसेच तिच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील ती टीका करांच्या निशाण्यावर असते. आता कंगनाने अशाच प्रकारचे एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. कंगनाने आता नवीन दावा केला आहे की, श्रीदेवीनंतर ती फक्त भारतातली एकमेव अभिनेत्री अशी आहे की, ती पदद्यावर खऱ्या अर्थाने विनोदी भूमिका करते.

तिने ट्विट केले आहे की,’तनू वेड्स मनू चित्रपटाने माझ्या करिअर वेगळी दिशा दिलीय . या चित्रपटातील माझी भूमिका विनोदी असून ती प्रेक्षकांना फार आवडली. या पूर्वीच्या चित्रपटामध्ये मी ठोकळेबाज भूमिकांमध्ये अडकून पडले होते. मात्र तनू वेड्स मनू पासून सुरू झालेला विनोदी भूमिकांचा प्रवास क्वीनमुळे अधिकच बहरला. श्रीदेवीनंतर विनोदी भूमिका सातत्याने साकारणारी मी बॉलीवूड मधली केवळ दुसरी अभिनेत्री आहे! असं म्हणत तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींशी कंगनाने स्वःताची तुलना केली.

कंगणाच्या या विधानानंतर तिला पुन्हा एकदा ट्रोलर्सचा सामना करू लागू शकतो. कंगणाने यापूर्वी देखील अशी बरीच विधाने केली होती.कंगना कधी स्वतःला टॉम क्रूजपेक्षाही चांगली स्टंट करणारी असल्याचं सांगते तर कधी मेरिल स्ट्रीपसोबत स्वतःची तुलना करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.