Take a fresh look at your lifestyle.

जो फिट आहे तो हिट आहे ; कंगणाने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून आपल्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आता पुनः एकदा वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. कंगना नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता नुकतंच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कंगनाने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. कंगनाने तिच्या आगामी चित्रपट धाकडच्या तयारीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना वर्कआऊट करताना दिसत आहे. “सकाळचा व्यायाम, आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जो फिट आहे तो हिट आहे. आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. चांगल्या माणसांच्या सहवासात राहण्याचा नेहमी प्रयत्न करा. जर आपण अशा लोकांना समोरा समोर भेटू शकत नसाल तर त्यांची पुस्तक वाचा.” अशा आशयाचं कॅप्शन कंगनाने व्हिडीओला दिलं आहे.

कंगना लवकरच ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘थलाइवी’ या चित्रपटात ती तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.