Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे व्हॉट्सॲप हॅक?; प्रायव्हेट चॅट झाले लीक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर भले इंडस्ट्रीमध्ये आजकाल फार दिसत नसेल. पण चर्चेत नाही अस अजूनतरी झालेलं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक नव्या अभिनेत्री आल्या पण करीनाचा चाहता वर्ग आजही मोठा आणि कायम आहे. यानंतर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, करिनाचं व्हॉट्सॲप हॅक झाल्याची बातमी पसरली आहे. इतकंच नव्हे तर तिचे काही प्रायव्हेट मेसेज सुद्धा लीक झाले आहेत.

आता हे वाचल्यानंतर अनेकजण म्हणतील यात काय विशेष आहे? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आपल्या वैयक्तिक जीवनाला पूर्ण सुरक्षित ठेवणाऱ्या दिग्गजांचे असे मेसेज लीक होणे गंभीर आहे. जर इतकी सुरक्षा ठेऊन यांचे खाजगी सार्वजनिक होत असेल तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? माहितीनूसार, करीनाच्या लीक मेसेजमध्ये ती ज्या व्यक्तीसोबत चॅट करत आहे, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची खास मैत्रीण रिया कपूर आहे. मुख्य म्हणजे सांगायची बाब अशी की, हे चॅट व्हॉट्सॲप हॅक झाल्यामुळे लीक झालेले नाही तर सोशल मीडियावर करीनाने स्वतः पोस्ट केल्यामुळे लीक झाले आहे.

 

करीना व्हाट्सएप चॅटचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘मला हा संवाद आवडत आहे…..’ चॅटची सुरूवात होताना रिया करीनाला विचारते तुला हॉट चॉकलेट, व्हीप्ड क्रिम पाठवू… यावर करीना नाही, मला ते आवडत नाही असे उत्तर देते. यावर रिया म्हणते, ‘मग हॉट फज सॉस आणि व्हॅनिला आइस्क्रीम? करीना यासाठी होकार देते आणि बोलते की, हा चांगला पर्याय आहे… दोघींचे हेच चॅट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.