Take a fresh look at your lifestyle.

कॅटरिना कैफला कोरोनाची लागण झाली असतानाही ‘टायगर ३’ चे थांबले नाही शूटिंग; हे आहे कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफला कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच तिने पोस्ट करून सांगितले आहे. तिची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने ती घरातच क्वारंटाइन झाली आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट टाइगर ३ च्या शूटिंग मध्ये व्यस्त होती. मात्र आता तिला कोरोनाची लागण झाली आहे म्हटल्यावर, त्याचा अंशतः का असेना शूटिंगवरही परिणाम होऊच शकतो. परंतु असे काही दिसण्यात आलेले नाही. येथे टाइगर ३च्या शूटिंगसंदर्भात वेगळीच माहिती समोर आली आहे.

tiger 3

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, टाइगर ३च्या शूटिंग शेड्युलमध्ये काहीच बदल झालेला नाही. सर्व काही ठरवलेल्या योजनेनुसारच होणार आहे. सध्या सलमान खान मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहे आणि एप्रिलच्या शेवटी कॅटरिना शूटिंग करणार आहे. वेबसाइटशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, टाइगर ३ साठीचे कॅटरिना कैफचे शूटिंग तीन आठवड्यानंतर असणार आहे. खरंतर असाच काहीसा प्लॅन आखण्यात आला होता. त्यामुळे टाइगर ३च्या शूटिंगला उशीर होणार नाही. सध्या सलमान खान आपल्या वाटेचे शूटिंग पूर्ण करीत आहे.

सध्या कॅटरिना होम क्वारंटाईन असून घरूनच उपचार घेत असल्याची माहिती तिने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत दिली होती. तिने या पोस्टमध्ये लिहिले होते की, माझी कोव्हिड १९ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी लगेच स्वतःला आइसोलेट केले आहे आणि घरीच क्वारंटाइन झाली आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमांचे पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती आहे, की त्यांनी स्वतःची टेस्ट नक्की करा. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभारी आहे. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.