Take a fresh look at your lifestyle.

उफ्फ! नोरा फतेहीच्या डान्स मूव्ह पाहून चाहत्यांच्या जीवाची झाली दैना; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या दिलखेचक अदा आणि डान्स मूव्हजमुले नेहमीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियावर ती स्वतःच इतकी अॅक्टिव असते कि ती अनेकदा वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नोरा एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याहीपेक्षा ती एक उत्तम डान्सर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ती स्वतःचे डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. शिवाय ती नेहमीच तिच्या फॅन्सचे मनोरंजनही करते. आता पुन्हा एकदा तिने सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून चांगलाच जाळ केला आहे. तिचा डान्स पाहून भले भले वेडे झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोराने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडियावर एक डान्सचा धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झाला आहे. या व्हिडीओत नोरा बिकीनी टॉप आणि शॉर्ट्स घालून कमल डान्स करताना दिसत आहे. हॉलिवूड गायक ड्रेकच्या ‘वन डान्स’ गाण्यावर नोराला जबरदस्त मुव्ह्स करताना पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. नोराच्या या डान्स व्हिडीओला तिच्या फॅन्सकडून भरभरून प्रेम मिळत आहे. तिने हा व्हिडीओ इंस्टाग्राम सोशल मीडियावर शेअर केला असून आतापर्यंत याला १५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स त्याला मिळाले आहे.

 

अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या डान्सच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. अनेक म्युझिक व्हिडीओत नोरा दिसत असते. शिवाय तिचे सिनेमातील डान्स नंबर्स चांगलेच गाजतत्. त्यासोबत डान्स रिअॅलिटी शो ‘बेस्ट डान्सर’मध्ये ती जज म्हणूनही दिसली होती. नोराने बॉलिवूडमध्ये आपल्या कामाची सुरूवात २०१४साली केली. हिंदीसोबत साऊथच्या अनेक सिनेमात तीने आयटम नंबर केले आहेत. पण तिला खरी ओळख मिळाली ती जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते चित्रपटातील दिलबर गाण्यामुळेच. यानंतर ती बऱ्याच सिनेमात डान्स नंबर्स करताना दिसली.