Take a fresh look at your lifestyle.

रिया चक्रवर्ती पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच ट्रोल झाली होती. मात्र हे ट्रोलिंग केवळ तेवढ्यापुरतं नसून अजूनही तितक्याच आवेगाने केले जात असल्याचे सामोरी आले आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा एरपोर्टवरील व्हिडीओ सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने शेअर केला आहे. या व्हिडिओला पाहताच ट्रोलर्स संतापले आणि पुन्हा एकदा रियाला ट्रोल करण्यात आले. रियाचा फोटो असो नाहीतर व्हिडीओ असो, तिला पाहताच सुशांतचे चाहते संतापाच्या भरात नको तश्या कमेंट्स करू लागतात.

रियाचा शेअर करण्यात आले व्हिडीओ हा एरपोर्टवरील आहे. एअरपोर्टवर रिया अतिशय सिंपल लूकमध्ये दिसली़ यावेळी मीडियाने तिला पोज देण्याची विनंती केली. पण ती न थांबता पुढे गेली. अश्याप्रमाणे रिया व्हिडिओमध्ये दिसली आणि सुशांतच्या चाहत्यांना राग आवरणे अशक्य झाले. ती बेलवर आहे, शहर सोडून कशी जाऊ शकते? असा सवाल एका युजरने केला. तर अन्य एका युजरने यापुढे जात, अतिशय वाईट पद्धतीने रियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आता कुणाच्या पैशावर जातेय मॅडम? असा सवाल या युजरने केला.

 

Comments   

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया व तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती. सुमारे महिनाभर रिया तुरुंगात होती. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नव्हती. पण हळूहळू तिचे आयुष्य ती पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

गेल्या काही दिवसांपासून रिया सोशल मीडियावर ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केला होता. तसे पाहता आजही मीडियाचे कॅमेरे तिच्या घराबाहेर नजर रोखून असतात. रिया लवकरच ‘चेहरे’ या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी, अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात रिया असूनही तिला प्रमोशनपासून खूप दूर ठेवण्यात आले आहे.