माझं हृदय तुटले आहे; नुकतंच लग्न केलेल्या अभिनेत्री सना खानने शेअर केली भावनिक पोस्ट
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री सना खानने (sana khan) गेल्या काही दिवसापूर्वी गुजरातचे मुफ्ती अनस सैयद यांच्यासोबत २० नोव्हेंबरला निकाह (लग्न) केले होते. यानंतर सनाने विवाहसोहळा आणि काश्मीरमधील हनीमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून आपलं हृदय तुटले आहे असं म्हंटल आहे.
त्याचं झालं असं की, सना खानबद्दल एका व्यक्तीने एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये तिचा भूतकाळ कसा होता ते दाखवलं. एवढंच नाही तर तिच्याबद्दल वाईटही बोलला. सनाला तो व्हिडिओ पाहून फार वाईट वाटलं. भूतकाळ मागे सोडलेला असतानाही अनेकजण पुनः पुन्हा तिला त्या सर्व गोष्टींची आठवण करून देतात याचं तिला वाईट वाटलं. याचसंबंधी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यात तिने स्पष्ट शब्दात लिहिलं की अशा नकारात्मक पोस्ट शेअर करून तुम्ही एखाद्याला नैराश्यात टाकत आहात. तसंच असं न करण्याची विनंतीही तिने यावेळी केली.
सना खानने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, ‘काही लोक अनेक दिवसांपासून माझ्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. तसेच माझ्यावर नकारात्मक व्हिडिओ बनवत आहेत. या सगळ्या गोष्टी मी सतत डोळ्याने पाहात असून मी गप्प राहणे पंसत केले आहे. परंतु आता माझ्या भूतकाळाशी निगडित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओत अनेक चुकीच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती ज्या गोष्टी पूर्णपणे विसरली आहे, त्या व्यक्तीला त्या गोष्टींची आठवण करून देणे चुकीचे आहे.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’