Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या चिंतेत वाढ; अख्खे कुटुंब सापडले कोरोनाच्या जाळ्यात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर दिवसागणिक वाढतच चालला आहे. आता या व्हायरसने सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांनाही आपल्या जाळ्यात पुरते ओढल्याचे दिसून येत आहे. बॉलिवूडभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होताना अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पा सोडून तिचा पती राज कुंद्रा, मुलगा विआन, मुलगी समीशा, सासू-सासरे आणि शिल्पाची आई अशा सर्वांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यानंतर आमच्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती शिल्पाने आपल्या चाहत्यांना केली आहे.

शिल्पाने स्वत: इंस्टाग्रामवर पोस्ट करीत या बाबतची माहिती पुरविलेली आहे. या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटले आहे कि, गेले दहा दिवस आमच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण राहिलेत. माझे सासू-सासरे पॉझिटीव्ह आलेत. यानंतर समीशा, विवान आणि आईला कोरोना झाला आणि आता राजही पॉझिटीव्ह आला आहे. सगळेजण आपापल्या खोलीत आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सूचनांचे पालन सुरू आहे.

आमच्या घरातील दोन स्टाफ मेंबर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माझी टेस्ट निगेटीव्ह आल आहे. परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांची प्रकृती हळूहळू सुधारतेय. या कठीण काळात मदत करणा-या सर्वांचे आभार. आमच्यासाठी प्रार्थना करा. शिवाय तुम्ही कोव्हिड पॉझिटीव्ह असा किंवा नसा पण कृपया मास्क घाला, सॅनिटाइज करा आणि सुरक्षित राहा.सकारात्मक राहा, असे आवाहनही तिने केले आहे.

याआधी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. यात आमिर खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कॅटरिना कैफ, आशुतोष राणा व त्याचे कुटुंब, भूमी पेडणेकर, सतीश कौशिक, मनोज वाजपेयी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. तर गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, मलायका अरोरा, अर्जुन कपूर यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे.