हॅपी बर्थडे सोनाली बेंद्रे; कॅन्सरला हरवून जिंकलेली ती…
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा आज 47वा वाढदिवस आहे. एकेकाळी सिनेसृष्टीवर राज्य करणारी आणि आपल्या मोहक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री आज सिनेसृष्टीपासून फार लांब असली तरीही तिच्या चर्चा सुरूच असतात. याचे कारण म्हणजे सोनाली आजही तितकीच सुंदर दिसते जितकी कधीकाळी दिसायची. त्यामुळे आजही ती अनेकांची क्रश आहे. तिच्या आयुष्यात तिने फार मोठी स्वप्ने पाहिली नाहीत पण जी पाहिली ती जिद्दीने पूर्ण केली. अश्या या अभिनेत्रीने एक असाही आयुष्यातील काळ पाहिला जेव्हा एकतर नवा जन्म नाहीतर मृत्यू अटळ होता. अश्याही परिस्थितीवर तिने मात केली आणि लढवैया ठरली.
सोनालीचा जन्म हा मूळ मराठी घरातला. मुंबईकर म्हणून मुंबईत जन्मलेली अभिनेत्री 1975 साली 1 जानेवारीला बेंद्रेंच्या घरात आनंद घेऊन जन्मली. मात्र एक काळ असा आला होता जेव्हा आयुष्याची खूप मोठी लढाई तिने हसत हसत जिंकली आहे. ही लढाई होती कॅन्सरसोबत. पण सोनालीने त्यावर मात करत अनेक कर्क रोग्यांना जगण्याची प्रेरणा दिली आहे.
सोनालीने विद्यालयीन वर्षातच अभ्यासासोबत मॉडेलिंगला सुरुवात केली आणि यामुळे तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगण, अनिल कपूर, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान अश्या दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केलं आहे. मात्र कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तिने बॉलिवूड पासून अंतर ठेवले. यानंतर परदेशात तिने ट्रीटमेंट घेतली आणि कॅन्सर वर मात केली. आज आपला 47 वा वाढदिवस ती नव्या उमेदीने जगतेय आणि म्हणूनच आज इंडस्ट्रीमध्ये तिच्याकडे अभिमानाने पाहिलं जात. तर पुन्हा एकदा हॅपी बर्थ डे सक्षम सोनाली..!