Take a fresh look at your lifestyle.

हॅपी बर्थडे जरीन खान; सिनेसृष्टीत येण्यापूर्वी करायची कॉल सेंटरमध्ये काम

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान आज स्वतःचा ३४ वा वाढदिवस साजरा करित आहे. जरीनने सलमानच्या ‘वीर’ सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छाप उठली नाही मात्र चर्चा एकदम जोरदार रंगली होती. कारण तिला बॉलिवूड डेब्यू बॉलिवूडचा दबंग अर्थातच सलमान खानने घडवून आणला होता. खरतर जरीन कॅटरिना कैफसारखी दिसते, म्हणून तीला ‘वीर’ चित्रपट मिळाला,अश्या चर्चांना उधाण आले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्यावेळी सलमान आणि जरीन यांच्या अफेअरच्या चर्चा देखील सुरू होत्या. पण काहीच दिवसांत या केवळ अफवा असल्याचे समोर आले होते.

अभिनेत्री जरीन खानचा जन्म सन १४ मे १९८७ रोजी मुंबईत झाला होता. बारावीत असताना जरीनच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि घराची पूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. खरंतर तिला डॉक्टर व्हायचे होते. पण वडील सोडून गेल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. यामुळे तिला तिचा अभ्यास सोडून कामाच्या शोधात जावे लागले. दरम्यान तिचे वजन जवळपास १०० किलो होते, त्यामुळे तिला काम मिळताना अडचणी यायच्या. पण कशीबशी तिला कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. मग कॉल सेंटरमध्ये नोकरी करत असताना जरीनने वजन कमी करण्यास सुरुवात केली.

एका काळानंतर तिचे कामात मन लागेना झाले आणि तेव्हा तिने एअर होस्टेस होण्याचे ठरवले. तिने सर्व राऊंड क्लिअर केले. या दरम्यान तिची ओळख सलमानशी झाली आणि झरीन चा बॉलिवूडचा प्रवास वीर चित्रपटाच्या माध्यमातून सुरू झाला. या चित्रपटानंतर तिने हाऊसफुल २, हेट स्टोरी ३, अक्सर २ या चित्रपटांमध्ये देखील काम केले.

पण जरीनला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. जरीन लवकरच हम भी अकेले तुम भी अकेले या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी ती चांगलीच मेहनत घेत असल्याचे कळत आहे.