हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु डॉक्टर,पोलिस, मीडियातील व्यक्तींसह अनेक भागातील लोक आपले काम करत आहेत.अशा परिस्थितीत बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांचे जोरदार कौतुक केले आहे.त्यांनी इंस्टाग्रामवर एका चित्रकलेचा फोटो पोस्ट केला आहे,ज्यामध्ये मास्क घातलेली परिचारिका मुलाच्या पोटात भारताचा नकाशा धरून आहे.
अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्यांना अभिवादन आणि आदर देण्यासाठी… हे संकट संपवण्यासाठी आमच्यासाठी कोण काम करत आहे.’
T 3479 – to honour to respect to bow to them .. all that have continued to work in extenuating circumstances .. 🙏🇮🇳 pic.twitter.com/DfhBUosjts
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 23, 2020
याशिवाय बिग बीने आणखी एक ट्विट केले असून त्यात कोलकाताच्या मोकळ्या रस्त्यांची छायाचित्रे दिसत आहेत. त्यांनी कोलकत्यातील लोकांचे कौतुक केले आहे.२२ मार्च रोजी देशात ‘जनता कर्फ्यू’ होता, ज्यामध्ये सगळ्या देशवासीयांनी सहकार्य केले. तसेच संध्याकाळी पाच वाजता या परिस्थितीत काम करणार्याना सगळ्या लोकांना प्रोत्साहन दिले.देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, तर सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
this is incredible .. especially for those that have lived and do live in Kolkata .. this is Howrah Bridge, Red Road (?) , the flyover to the Airport .. it is impossible to imagine this sight .. https://t.co/CmUIMzKHk0
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 23, 2020