Take a fresh look at your lifestyle.

‘प्रतिज्ञा’ फेम अनुपम श्याम काळाच्या पडद्याआड; अवयव निकामी झाल्यामुळे उपचारादरम्यान निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेते अनुपम श्याम यांचे काल (८ ऑगस्ट २०२१) निधन झालं आहे. दरम्यान ते ६३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अनुपम यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांनी मन की आवाज प्रतिज्ञा २ या मालिकेत ठाकूर सज्जन सिंग हि भूमिका साकारली होती. त्यांच्या मूत्रपिंडात संसर्ग झाला होता. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांची तब्येत अस्थिर होती. यानंतर अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. डायलिसिस झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. या दरम्यान अनुपम गोरेगाव येथे लाइफलाइन रुग्णालयात दाखल झाले होते.

काही दिवसांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजार उद्भवला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.या उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले. त्यामुळे २ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. अखेर काल रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे, अनुपम श्याम यांना मागील महिन्याभरापासून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यांची हि झुंज अपयशी झाली.

अनुपम यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात दीड महिन्यापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना वारंवार डायलिसिस करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डायलिसिसमध्ये खूप खर्च झाल्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक उपचार केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर डायलिसिस न केल्यामुळे त्यांच्या छातीत पाणी जमा झाले होते. दरम्यान डायलिसिस पुन्हा सुरू केल्यानंतर त्यांना बरं वाटतं होते. या काळात अनुपम श्याम यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने इंडस्ट्रीतील लोकांकडे विशेषत: आमिर खान आणि सोनू सूदकडे मदत मागितली होती. मात्र, मनोज वाजपेयी यांनी अनुपम यांना मदत म्हणून एक लाख रुपयांची मदत दिली होती.