Take a fresh look at your lifestyle.

आयुषमान खुरानाच्या ‘अंधाधुन’ चित्रपटाचा बनणार तेलगू रीमेक हा दाक्षिणात्य अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना याला ‘अंधाधुन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, आता या चित्रपटाचा तेलगू रीमेक होणार आहे.सोमवारी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये याची घोषणा करण्यात आली. ‘अंधाधुन’च्या तेलगू रीमेकमध्ये नितीन मुख्य अभिनेता म्हणून काम करणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेरलापाका गांधी करणार आहेत, तर एन सुधाकर रेड्डी आणि निकिता रेड्डी हे निर्मिती करणार आहेत.या चित्रपटाचे शूटिंग जून २०२० मध्ये सुरू होईल.

 

श्रीराम राघवन यांच्या ‘अंधाधुन’ या थ्रिलर चित्रपटात आयुषमान व्यतिरिक्त तब्बू आणि राधिका आपटे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटासाठी आयुषमान खुरानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याव्यतिरिक्त यावर्षी ‘बेस्ट हिंदी फिल्म’ प्रकारातील राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. ‘अंधाधुन’ ५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे जगभरात ४५० कोटींपेक्षा जास्त व्यायसाय केला आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: