हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कोरोना विषाणूचा कहर पाहता, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी खबरदारी म्हणून अनेक पावले उचलली जात आहेत. लोक एकमेकांच्या संपर्कातही येण्यास नकार देत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरही नुकतेच अमेरिकेतून परतले आहे आणि त्यांनी स्वत: ला आइसोलेशन ठेवले आहे. या अभिनेत्याने मुंबई विमानतळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे, ज्यात त्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांनीही मास्क घातला आहे. व्हिडिओ शेअर करतानात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘फाइनली चार महिन्यांनंतर न्यूयॉर्कहून मुंबईला परतलो आहे. विमानतळाचे अधिकारी कोरोना विषाणूसारख्या परिस्थितीला सक्तीने पण नम्रपणे हाताळत आहेत हे पाहून आम्हाला आनंद होतोय. संकटाचा सामना कसा केला जावा याचं भारत एक उदाहरण देत आहे. अधिकारी आणि लोकांचा अभिमान आहे.जय हो. ‘
Landed in Mumbai from NY. It was so gratifying to see how strictly but politely & competently our authorities at the airport are dealing with #Corona situation. India is really setting up an example of how to deal with the crises. Proud of authorities & the people. Jai Ho!🙏🇮🇳 pic.twitter.com/YsUieS3rR3
— Anupam Kher (@AnupamPKher) March 20, 2020
एका चॅनेलवर प्रसारित होणार्या टीव्ही मालिकेत आणि मेडिकल ड्रामा ‘न्यू एम्स्टरडॅम’ यामध्ये काम करत असल्या कारणाने अनुपम खेर गेल्या चार महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये होते. विमानतळावर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व ती निगेटिव्ह असल्याचे आढळले. पण तरीही ते घरीच सेल्फ आइसोलेशन राहतिल.
As a precaution I decided not to visit Mom. So facetimed her instead. Initially she got angry but soon understood the importance of social distance. In this case mother-son distance. Both of us felt bad. पर क्या करे ? आजकल के माहौल में ये जरूरी है! #DulariiRocks…Always. 😍🤓😎 pic.twitter.com/pCeTCJ9r1W
— Anupam Kher (@AnupamPKher) March 20, 2020
कोरोना विषाणूमुळे भारतातील अनेक शहरे बंद झाली आहेत. या प्राणघातक साथीने २०० हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत, तर चार लोकांचा मृत्यू झाला आहे .