Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड कास्टिंग डिरेक्टर सेहर लतीफ काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच मंडळींनी जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आता बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंतच्या अनेको चित्रपटात आणि वेब शोमध्ये कलाकारांचे कास्टिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कास्टिंग डियरेक्टर सेहर अली लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

सेहर लतीफ यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर त्यांचे सोमवारी निधन झाले व त्यांनी जगाचा निरोप घेतला.

दिवंगत कास्टिंग डिरेक्टर सेहर अली लतीफ यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीसह अगदी हॉलिवूड चित्रपटसृष्टीवरदेखील शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. सेहर लतीफया ‘लंच बॉक्स’, ‘मॉन्सून शूटआउट’, ‘शकुंतला देवी’, ‘दुर्गामती’, ‘मस्का’ यासारख्या अनेक चित्रपटांच्या तसेच ‘भाग बीनी भाग’ नावाच्या वेब शोच्या त्या कास्टिंग डिरेक्टर होत्या. सेहर लतीफ यांनी नेटफ्लिक्स फिल्म ‘मस्का’ आणि वेब शो ‘भाग बिनी भाग’ हे त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अर्थात ‘म्युटंट फिल्म्स’ अंतर्गत निर्मित केले होते.

कास्टिंग डिरेक्टर सेहर अली लतीफ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट आणि वेबसिरीज शोच्या कास्टिंगमध्ये मदत करण्यासाठी ओळखल्या जातात. ज्यात ‘ईट लव्ह प्राइ’, ‘फ्यूरियस ७’, ‘टायगर्स’, ‘व्हायसरॉयज हाऊस’, ‘मॅकमाफिया’ आणि ‘सेन्स ८’ या लोकप्रिय सिरीजचा समावेश आहे. ‘गोल्ड’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘नोबेलमन’ सारख्या चित्रपटात तर कार्यकारी निर्माता म्हणूनही सेहर अली लतीफ यांचे नाव होते.

सेहर लतीफ यांनी ‘मिलियन डॉलर आर्म’, ‘लाइन ऑफ डिसेंट’ अशा अनेक परदेशी चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांना कास्ट केले होते. यामुळे अनेको कलाकारांचा आधार गेला असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री निमरत कौर, राजकुमार राव, सान्या मल्होत्रा, ताहिरा कश्यप, नोरा फतेही, रोहित सराफ, अंगद बेदी, स्वरा भास्कर या सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.