Take a fresh look at your lifestyle.

‘बाबा का ढाबा’ च्या मदतीला सरसावले बॉलीवूड कलाकार ; केली ‘अश्या’ प्रकारे मदत

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिल्लीतील मालविया नगर परिसरात एक छोटासा ढाबा चालवणारे ८० वर्षीय कांता प्रसाद यांच्या मदतीला आज संपूर्ण देश पुढे सरसावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून काहीच कमाई होत नसल्याचं सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि देशभरातून त्यांना मदत मिळू लागली. ‘बाबा का ढाबा’वर आता लोकांनी खच्चून गर्दी केली असून कांता प्रसाद यांच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी हसू आलं . विशेष म्हणजे ‘बाबा का ढाबा’ची मदत करण्यात सेलिब्रिटीसुद्धा मागे नाहीत. सुनील शेट्टी, स्वरा भास्कर, रवीना टंडन अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी आवाहन केलं आहे.

रणदीप हुडाने ‘बाबा का ढाबा’चा पत्ता ट्विटरवर लिहित लोकांना तिथे जाऊन मदत करण्याची विनंती केली

बाबा का ढाबा’. दिल्लीवालो दिल दिखाओ. जो कोणी इथे येऊन जेवेल त्यांनी मला एक फोटो पाठवा. तो फोटो मी सोशल मीडियावर शेअर करेन. सोबतच तुमच्यासाठी एक खास मेसेजदेखील पाठवेन”, असं आवाहन रविना टंडन ने केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.