Take a fresh look at your lifestyle.

आसामवासी पूरग्रस्तांना बॉलीवूडकरांकडून मदतीचा हात; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या २ आठवड्यांपासून आसाम राज्यात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ईशान्य भारताच्या इतिहासात अत्यंत भीषण पूराशी आसामवासीय लढत आहेत. या पूरामूळे आसामवासी पूरग्रस्तांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. पुराचा फटका बसलेल्या या आसामवासियांचे फोटो पाहून कुणाच्याही काळजाला चिरा पडतील. आतापर्यंत २१ लाख आसामवासीय भीषण पुरात अडकले आहेत अशी माहिती मिळाली असून १३० हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. अनेकांची घरे, संसार आणि कुटुंब उदध्वस्त झाली. अशावेळी आसामच्या मदतीसाठी बॉलिवूडकरांनी हात पुढे केला आहे. बॉलिवूडकरांनी केलेल्या मदतीसाठी सोशल मीडियावर नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

आसामला आताच्या परिस्थितीत आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज आहे. देशभरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. दरम्यान बॉलिवूडकरांनीही एक मदतीचा हात दिला आहे. यामध्ये अभिनेता आमिर खान, अर्जुन कपूरसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. ‘आसामला या महापूरातून सावरण्यासाठी सीएम रिलीफ फंडात बॉलिवूडच्या विविध कलाकारांनी देणगी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे . प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी सीएम रिलीफ फंडात २५ लाखांचे योगदान दिले. त्यांनी दाखवलेल्या अस्थे प्रती आम्ही ऋणी आहोत,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

याशिवाय अनेक अन्य कलाकार आहेत ज्यांनी आसामला मदत केली आहे. यात गायक आणि अभिनेता यांच्यासह निर्माते आणि दिग्दर्शकांचाही समावेश आहे. सोनू निगम, अर्जुन कपूर, रोहित शेट्टी, भूषण कुमार यांनीही मदत केली आहे. कुमार यांनी ११ लाख, सोनू निगम, अर्जुन कपूर, रोहित शेट्टी यांनी प्रत्येकी ५ लाख तर आमीर खानने २५ लाख रुपये मदतनिधी दिला आहे असे स्वतः सरमा यांनी सांगितले. सध्या आसाम या पुरातून सावरत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पूरजन्य परिस्थिती आहे.