Take a fresh look at your lifestyle.

… तरीही कोरोना पॉझिटिव्ह?; प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही फराह खानला कोविडची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील अत्यंत लोकप्रिय चेहरा असलेली प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि सेलिब्रिटी डान्स कोरिओग्राफर फराह खान हिला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत फराहने स्वतःच अधिकृत सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. आपल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं आढळून येताच फराहला मोठा धक्का बसला आहे. कारण फराह खानने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि तरीही तिला कोरोनाची लागण झाली आहे.


यासंदर्भातील माहिती देताना कोरिओग्राफर फराह खानने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिले कि,‘… ‘मला आश्चर्य वाटतं की माझ्यासोबत असं घडलं आहे कारण मी लसीचे दोन्ही डोस घेतले आणि जवळजवळ सर्व लसीकरण पूर्ण केलेल्या लोकांबरोबर काम करूनही असं कसं घडू शकतं? आणि… तरीही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे? असो.. मी माझ्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांना आधीच सूचित केलं आहे आणि त्यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितलं आहे. वाढत्या वयामुळे आणि स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे, जर मी कोणाला सांगायला विसरली असेल, तर तुम्हीही तुमची टेस्ट करुन घ्यावी. मला आशा आहे की मी लवकर बरी होईल’. असे लिहीत फराहने आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना आणि आपल्या चाहत्यांना सूचित केले आहे.

 

दरम्यान, गतवर्षापासून कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. आता कुठे लोकांनी सुटकेचा स्वास सोडला असताना तिसऱ्या लाटेची संभाव्यता दर्शविली जात आहे. याआधी आतापर्यंत कलाविश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यात मोठंमोठ्या कलाकारांची नावं सामील आहेत. जसे कि, अमिताभ बच्चन, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करीम मोरानी, रणबीर कपूर, आलीया भट या कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. या शिवाय काही कलाकारांनी कोरोनाशी लढत दिली मंत्रही लढत अपयशी झाल्यामुळे जगाचा निरोप घेतला. यानंतर आता फराहने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही तिला कोविड झाल्यामुळे बॉलिवूड जगतात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.