Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूडमध्ये ७५ रुपयांच्या मानधनापासून सुरु झाला ‘या’ अभिनेत्याचा प्रवास, आज आहे अब्जाधीश…

0

चंदेरी दुनिया । सलमान खान आज 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस जवळचा मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत साजरा करतो. यंदाही सलमानने सोहेल खानच्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भाईजानचा जन्म २७ डिसेंबर १९८५ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये झाला. त्याचे मूळ नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान आहे. सलमानला इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे.

सलमानने बॉलिवूडचे कथालेखक वडील सलीम खान यांचे बोट धरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असली, तरी त्याचा प्रवास खडतर होता. त्याने बी ग्रेडच्या सिनेमांमध्येही काम मिळवण्याचा प्रयत्न केले होते. काही वेळा तर त्याला शिपायाकरवी बाहेरही घालवून दिले गेले होते. प्रसंगी ७५ रुपये दिवसाच्या मानधनावरही त्याने काम केले आहे.

गेली तीन दशके तो बॉलिवूडचा चहेता स्टार आहे. त्याची लोकप्रियता जेवढी आहे, तेवढेच वादही त्याच्या नावावर जमा झाले आहेत. पण त्या सगळ्याला पुरून उरला तो सलमान. आज तो सर्वाधिक कमाई करणारा स्टार आहे आणि मुख्य म्हणजे रोमॅंटिक आणि अॅक्‍शन अशा दोन्ही स्टाईलच्या सिनेमांमध्ये त्याचे करोडो चाहते आहेत. सलमानचे चित्रपटात येण्याआधी लेखक बनण्याचे स्वप्न होते.

सलमान खानची ‘बीइंग ह्युमन’ ही संस्था गरजवंत लोकांची मदत करते. सलमानने आजपर्यंत अनेक नवे चेहरे फिल्म इंडस्ट्रीला दिले आहेत.Leave a Reply

%d bloggers like this: