हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोनाव्हायरसमुळे आयसोलेशन राहत आहेत.आयसोलेशनमध्ये राहूनही बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह राहतात. अलीकडेच बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आयसोलेशन संदर्भात ट्विट केले असून ते खूप व्हायरल होत आहे. अनुभव सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये आयसोलेशनच्या फायद्यांवर प्रकाश टाकला आहे. बॉलिवूड दिग्दर्शकाचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याचबरोबर लोक यावर तीव्र भाष्यही करीत आहेत.
Isolation का एक और फ़ायदा। ये ग़लतफ़हमी ख़त्म हो जाती है कि दुनिया आप चला रहे हैं या ये धरती आप घुमा रहे हैं। और हफ़्ते भर के अपने व्यक्तिगत अनुभव से एक और बात बता दूँ। इंसान सोने से नहीं थकता।
— Anubhav Sinha (@anubhavsinha) March 19, 2020
आपल्या ट्वीटमध्ये अनुभव सिन्हा यांनी आयसोलेशनबद्दल सांगितले की, “आयसोलेशनचा आणखी एक फायदा असा कि हा गैरसमज संपतोय की जग तुम्ही चालवत आहात आणि ही पृथ्वी तुम्ही फिरवत आहे आणि आणखी एक गोष्ट आठवड्या भराच्या माझ्या वैयक्तिक अनुभवातून मला सांगू द्या कि माणूस झोपण्याने थकत नाही. ” याखेरीज अनुभव सिन्हा यांनी वेगळ्या विषयी आणखी एक ट्विट केले, ज्यात त्याने लिहिले आहे, “आयसोलेशन ही काही वाईट गोष्ट नाही. ही एक चांगली, जबाबदार आहे, या बरोबरच तुम्हाला वाचण्यास, झोपायला, संगीत ऐकायला मिळेल, भावांशी बोलणे, कार्यक्रम पहाणे, आयुष्य पाहण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची गरज आहे. “
Isolation is a not a bad thing. It’s woke, it’s cool, it’s responsible, it’s needed plus you get to read, sleep, listen to music, talk to cousins, watch shows, look out the window, look back at life, look ahead at life, have a gin in the day whiskey at night while docs work. No?
— Anubhav Sinha (@anubhavsinha) March 19, 2020
बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. तिथेच कोरोनाव्हायरसबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या १६९ पेक्षा जास्त झाली आहे. त्याच वेळी, जगभरात विषाणूच्या संसर्गामुळे जवळपास ७५०० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे २ लाख लोकांना याचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. यासह,या विषाणूमुळे आतापर्यंत भारतात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसचा कहर पाहून सरकारनेही जमाव बंदी लागू केली आहे.