Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कारणामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरला मागावी लागली माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्दर्शक करण जोहरवर (Karan johar) काही दिवसांपूर्वी  चोरीचा आरोप लावण्यात आला होता. दिग्दर्शक मधूर भंडारकरनं हा आरोप केला. मधूर भंडारकरनं (madhur bhandarkar) आपल्या ट्विटवर अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली होती. करण जोहरनं आपलं टायटल चोरल्याचा आरोप त्यानं केला होता.हे शिर्षक परवानगी शिवाय वापरण्यात आल्याचं देखील भंडारकर म्हणत होते. आता करणनं त्याची हात जोडून माफी मागितली आहे आणि याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे.

करणने ट्विटरच्या माध्यमातून फिल्ममेकर मधुर भंडारकर यांची माफी मागितली आहे. तो म्हणला, ‘आपलं नातं फार वर्षांपूर्वीचं आहे. मला तुमचं काम देखील फार आवडतं. मी नेहमीचं तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत.’ असं करण म्हणत आहे. तुम्ही माझ्यामुळे अडचणीत आहात आणि मी त्यासाठी माफी मागत असल्याचे सांगत करण म्हणाला, ‘मी माझ्या सीरिजसाठी ‘द फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ (The Fabulous Lives of Bollywood Wives)’ हे नाव निवडलं आहे. मला विश्वास आहे की तुम्ही हा वाद विसराल. 

करणं पुढे म्हणाले, मी तुझी माफी मागतो. मी तुला सांगू इच्छितो की आम्ही आमच्या सीरिजला फॅब्युलस लाइव्सच्या टायटलनं सोशल मीडियावर प्रमोट करतो आहे. जे एक फ्रेंचाइजचं टाइटल आहे. फॉर्मेट, नेचर, प्रेक्षक आणि सीरिजचं टायटल वेगळं आहे आणि यामुळे तुमच्या प्रोजेक्टला कोणतंही नुकसान होणार नाही, यावर विश्वास ठेव”, असंही करण म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.