Take a fresh look at your lifestyle.

शेवटी विजय त्याचाच होतो जो … ; करण जोहरची ही पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर जर सर्वाधिक रोषाला जर कोणाला सामोरे जावे लागले असेल तर ते प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरला. काळविश्वातील घराणेशाही वरून करण जोहर वर सडकून टीका करण्यात आली. त्यामुळे २०२० या वर्षात करण जोहर सातत्याने प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, या सगळ्यामधून बाहेर पडत करणने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आली आहे.

करणने सोशल मीडियावर त्याच्या मुलांसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने मागील वर्षातील नकारात्मक गोष्टीं विसरुन पुढे जाण्याचा निर्धार केल्याचं म्हटलं जात आहे.

“माझे कुटुंब व माझे मित्र या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. ते कायम माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. तसंच माझ्या आजूबाजूच्या सर्व व्यक्तींचाही मी आभारी आहे. हे खरं आहे की, मागचं वर्ष आपल्यासाठी सोपं नव्हतं. त्या वर्षाने आपल्याला चांगला धडा शिकवला आहे. पण शेवटी विजय त्याचाच होतो जो सगळ्या अडथळ्यांना पार करुन पुढे जातो”, अशी पोस्ट करणने शेअर केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.