हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जुदाई’, ‘लाडला’ आणि ‘जवानी जानेमन’ अशा असंख्य चित्रपटातील आई, दादी आणि नानीची भूमिका साकारणारी ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल १४ मार्च रोजी आपला ७१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्यांचा जन्म १९४९ मध्ये दिल्ली येथे झाला.
फरीदा जलालने आपल्या ५० वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी तेलगू आणि तमिळ चित्रपटही केले आहेत.
फरीदाने १९६७ मध्ये ‘तकदीर’ चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. ती ‘पारस’, ‘हीना’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ मधील उत्कृष्ट अभिनयांसाठी ओळखली जाते. १९९० ते २००० या काळात बहुतेक चित्रपटात त्यांनी आईची भूमिका केली होती. अलीकडेच ती सैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’ चित्रपटातही दिसली होती.
चित्रपटांव्यतिरिक्त फरीदा जलाल यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. ती ‘ये जो है जिंदगी’, ‘देख भाई देख’, ‘शरारत’ आणि ‘अम्माजी की गली’ मध्ये दिसली आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना फरीदा जलालने अभिनेता तबरेज बर्मवारशी लग्न केले. दोघांनाही यासीन नावाचा मुलगा आहे. ‘जीवन रेखा’ चित्रपटाच्या सेटवर फरिदा आणि तबरेज यांची भेट झाली, जिथे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न केले. लग्नानंतर फरीदा आपल्या पती व मुलासमवेत बेंगळुरुला गेली आणि जेव्हा चित्रपटांची ऑफर दिली जात नव्हती तेव्हा तेथेच राहू लागली. तथापि, २००३ मध्ये तबरेजचा मृत्यू झाला.