हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ११ मार्च रोजी ती लंडनहून लखनऊला तिच्या घरी आली. लंडनहून लखनऊला परत आती तेव्हा ती कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह होती.तिला होम क्वारेन्टाईनमध्ये रहाण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु तिने त्या सूचनांचे पालन केले नाही आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली . कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी दिल्यानंतर आता लखनऊच्या सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात कनिका कपूरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कनिका कपूर यांच्या विरोधात कलम १८८,२६८,२७० अंतर्गत लखनौच्या पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. सीएमओ लखनऊ यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, ११ मार्च रोजी कनिका विमानतळावर आली तेव्हा तिला लागण झाली होती, परंतु आइसोलेशनमध्ये राहण्याऐवजी ती कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती.
कनिका कपूरच्या सार्वजनिक कार्यक्रमातील सहभागामुळे बरेच लोक संक्रमित होऊ शकतात.कनिकासह त्या पार्टीत ताज हॉटेलमध्ये बरेच अधिकारी व नेत्यांचा समावेश होता. कनिका कपूरला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर वसुंधरा राजे सेल्फ आईसोलेशन मध्ये राहत आहेत. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
कनिका कपूरने ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याचे स्पष्टीकरण दिले आहे.तिने लिहिले – मला गेल्या ४ दिवसांपासून तिला फ्लूची लक्षणे होती. त्यानंतर माझी टेस्ट झाली त्यामध्ये कळले कि मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मी आणि माझे कुटुंब डॉक्टरांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत आहोत. मी डॉक्टरच्या देखरेखीखाली आहे जेणेकरून इतर कोणालाही संसर्ग होऊ नये.
कनिकाने पुढे लिहिले आहे,”१० दिवसांपूर्वी जेव्हा मी घरी परत येत होते, तेव्हा मला विमानतळावर स्कॅन केले गेले. ४ दिवसांपूर्वी मला कोरोना विषाणूची लक्षणे दिसली आहेत. या टप्प्यावर, मी लोकांना आवाहन करू इच्छित आहे की त्यांनी सेल्फ आईसोलेशन मध्ये राहावे आणि लक्षणे दिसत असल्यास टेस्ट करून घ्या. मला बरं वाटतंय, सामान्य फ्लूसारखा हलका ताप घ्या. तथापि, आपण यावेळी समजूतदार नागरिक बनून आपल्या अवतीभवतीचा विचार करण्याची गरज आहे.