हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ‘पद्मावत’ नंतर श्री राजपूत करणी सेनेने आता ‘पृथ्वीराज’च्या निर्मात्याकडे चित्रपटातील ऐतिहासिक गोष्टींशी छेडछाड करू नये अशी मागणी केली आहे. अक्षय कुमार अभिनीत ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे चित्रीकरण जयपूरमधील जमुवरामगड गावात केले जात आहे. राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंग मकराना यांच्या नेतृत्वात संघटनेच्या सदस्यांनी शनिवारी जमुवरमगडमध्ये चित्रपटाचे शूटिंग थांबवावे आणि चित्रपटाच्या ऐतिहासिक गोष्टींशी छेडछाड करू नये अशी मागणी करत शुटिंगचा निषेध केला.
चित्रपटाच्या पटकथामध्ये ऐतिहासिक गोष्टींमध्ये छेडछाड होणार नाही, अशी ग्वाही चित्रपटाच्या दिग्दर्शकाने संस्थेच्या नेत्यांना दिली आहे. शनिवारी संस्थेचे कार्यकर्ते शूटिंगस्थळी पोहोचले त्यावेळी अक्षय कुमार तिकडे शूटिंग करत नव्हता. मकराना यांनी सोमवारी सांगितले की आम्ही सोमवारी चित्रपटाच्या स्क्रिप्ट वर चर्चा चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्र प्रकाश यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना ऐतिहासिक गोष्टींमध्ये छेडछाड करू नका असे सांगितले. ते म्हणाले की, पृथ्वीराज चौहान यांना प्रेमी म्हणून चित्रित केले जाऊ नये. त्यांनी (चित्रपटाचे दिग्दर्शक) आम्हाला आश्वासन दिले की चित्रपटात असे काही घडणार नाही, परंतु आम्हाला लेखी आश्वासनाची आवश्यकता आहे.
पृथ्वीराज यशराज फिल्म्सचे निर्माते असून हा चित्रपट राजपूत शासक पृथ्वीराज चौहानवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराजची भूमिका साकारत आहेत, तर मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर पत्नी संयोगिताच्या भूमिकेत दिसेल.