हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । चीनमधून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश झाला आहे. भारतसुद्धा याचा बळी पडला आहे आणि शेकडो लोकांच्या पॉजिटिव केससह या धोकादायक विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूडमध्येही कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे. असेच काहीसे ‘भूलभुलैया२’ च्या सेटवरही दिसत आहे. लखनौमध्ये चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनी मास्क लावून शूट केले.
चित्रपटाचा नायक कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘भूलभुलैया २’ चे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी संपूर्ण टीमला सूचना केली आहे की, सर्व सुरक्षा उपायांचा अवलंब केल्यावरच शुटिंग केले पाहिजे. या व्हिडिओमध्ये सर्व क्रू मेंबर्स शूटच्या वेळी मास्क घालून काम करताना दिसत आहेत. या पोस्टच्या शेवटी कार्तिक ने एक कॅप्शन हि दिला आहे “स्टे सेफ गायस कांट स्ट्रेस दिस एनफ #वाश योर हैंड्स #कोरोना स्टॉप करो ना”.
View this post on Instagram
Stay safe guys. Can’t stress this enough #WashYourHands #CoronaStopKaroNa
प्रियांका चोप्रानेही नुकताच इंस्टा पोस्टद्वारे हात मिळवण्याऐवजी चाहत्यांना अभिवादन करण्याचा आग्रह धरला आहे. सलमान खान, अनुपम खेर, कपिल शर्मा, बिपाशा बसू यांच्यासह डझनभर सेलिब्रिटी वेळोवेळी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लोकांना जागरूक करत आहेत.
भारताबद्दल बोलायचे झाले तर देशातही ७८ रुग्णांची पुष्टी झाली आहे. गुरुवारी कोरोना विषाणूमुळे भारतातील पहिला मृत्यूही झाला आहे. कर्नाटकातील एका ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सर्व लोक सध्या कोरोना विषाणूंमुळे घाबरले आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा महाविद्यालये आणि सिनेमा हॉल बंद आहेत. लोकांना परदेशात जाऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे.