Take a fresh look at your lifestyle.

खतरों के खिलाडी १०: करिश्मा तन्नाने भीती दूर करण्यासाठी केला हा आश्चर्यकारक स्टंट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । रोहित शेट्टीचा रिऍलिटी शो खतरों के खिलाडी सीझन १० बल्गेरियात चालू झाला आहे. या शोमध्ये यावर्षी करण पटेल, बलराज स्याल, करिश्मा तन्ना, शिविन नारंग, तेजस्वी, आरजे मलिष्का, धर्मेश, राणी चटर्जी, अमृता खानविलकर आणि अदा खान यांनी सहभाग घेतला आहे. शोमधील सर्व स्पर्धक त्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आगामी एपिसोडमध्ये करिश्मा तन्ना एक सरप्राईज स्टंट करणार आहे.

खतरों के खिलाडीचा एक नवीन प्रोमो आला आहे ज्यामध्ये करिश्मा तन्ना तोंडात साप ठेवताना दिसणार आहेत. या स्टंट दरम्यान ती मागील मोसमातील स्पर्धक हर्ष लिंबाचियासोबत दिसणार आहे. व्हिडिओमध्ये वॉटर बॉक्स दिसत आहे, ज्यामध्ये एका बॉक्समध्ये हर्ष उभा आहे आणि दुसर्‍या बॉक्समध्ये पाण्यात साप आहेत. करिश्मा हे साप तिच्या तोंडातून काढून हर्षाच्या डब्यात ठेवत आहे.

 

व्हिडिओमध्ये बाकीचे स्पर्धक करिश्माचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की करिश्माने हा स्टंट अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण केला असेल.या शोच्या पहिल्या आठवड्यात राणी चटर्जी, बलराज स्याल, आरजे मलिष्का यांना ‘फियर फंदा’ मिळाल आहे.