Take a fresh look at your lifestyle.

‘का अक्कल पाझरवता?’; जावेद अख्तर नेटकऱ्यांच्या संतापाचे शिकार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे नेहमीच चर्चेत असतात. याचे कारण म्हणजे त्यांची मुद्दे मांडण्याची शैली. ते नेहमीच जगात सुरु असलेल्या विविध विषयांवर आपले परखड मत मांडतात. दरम्यान अनेकदा ते वादग्रस्त वक्तव्य करतात. या अश्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच ते सोशल मीडियाच्या जगात प्रचंड प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. वादग्रस्त वक्तव्य आणि कंगना रनौत यांचे जितके घट्ट नाते आहे अगदी तितकेच घट्ट नाते गीतकार जावेद अख्तर यांचे वादविवादांशी आहे. अलीकडेच त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत अशी काही विधानं केली आहेत कि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जावेद अख्तर यांचा चांगलाच फडशा पाडला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक वीर होऊन गेले ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणूनच आज आपण इतक्या माजात आणि इतक्या ऐटीत जगात आहोत. त्यामुळे अश्या कोणत्याही वीराबद्दल कुणीही आक्षेपार्ह विधान वा वक्तव्य करणे कुणालाही साहजिकच आवडणार नाही. यातच कारणामुळे गीतकार जावेद अख्तर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची हि प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या पचनी न पडल्याने त्यांना नेटकऱ्यांचा संतापाचा दाह सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावर जावेद अख्तर यांची ती प्रतिक्रिया आणि नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट सध्या चांगल्याच व्हायरल झाल्या आहे.

त्याच झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. तेथे नेताजींचा ग्रॅनाइटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार अद्वैत गडनायक यांनी बांधला आहे. या गोष्टीची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. यावर गीतकार जावेद अख्तर यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले कि, नेताजी यांच्या पुतळ्याचा विचार तर ठीक आहे. परंतु पुतळ्याची निवड योग्य नाहीये. या पुतळ्याभोवती गर्दी राहिल आणि पुतळा नेहमी सॅल्युट करताना दिसेल. हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. एक तर तो पुतळा बसलेला पाहिजे होता नाहीतर हवेत हात फिरवून घोषणा देताना पाहिजे होता.”

या ट्विटनंतर जावेद अख्तर ट्रोल होताना दिसत आहेत. यावर अनेक नेटकऱ्यांनी आपण आपलं ज्ञान आपल्याजवळच ठेवावं असं म्हटलं आहे. तर अनेकांनी का अक्कल पाझरवता? अशा शब्दांत त्यांना सुनावलं आहे. एका व्यक्तीने ट्विटवर रिप्लाय देताना लिहिले कि, “जावेद सर, प्लीज एकदा हे देखील म्हणा की, दिवसातून पाच वेळा नमाज करण्याचा विचार देखील ठीक आहे पण लाऊड स्पीकरचा वापर करणे योग्य नाही. नमाज एक वेगळी गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणताही दंगा न करता घराच्या आता केला पाहिजे.