Take a fresh look at your lifestyle.

सुशांत सिंह प्रकरणात अनुपम खेर यांनी केली मित्र महेश भट्ट यांची पाठराखण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नेपोटिजमचा मुद्दा समोर आल्याने अनेक कलाकारांना रोषाचा सामना करावा लागला आहे. या यादीत करण जोहर, महेश भट्ट, जावेद अख्तर,आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्यातचं महेश भट्ट यांचे रिया चक्रवर्तीशी चांगले संबंध असल्यामुळे महेश भट्ट यांनाही टीकेचा सामना करावा लागत आहे.

याचवेळी, महेश भट्ट यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले की जोपर्यंत काही सिद्ध होत नाही तोपर्यंत ते काहीच बोलणार नाहीत. अनुपम खेर म्हणाले की मी महेशचा आभारी आहे. महेशने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. जोपर्यंत महेश स्वत: मला काही सांगत नाही किंवा काही सिद्ध होत नाही तोपर्यंत मी त्यांना बेनिफिट ऑफ डाउट देऊ इच्छितो. मी काही अंध नाही .मात्र आता काहीच बोलणार नाही..माझ्या कुटुंबांनी मला शिकवलं आहे की ज्या हातानी तुम्हाला मदत केली आजे ते हात कधीच कापू नका.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात चिडलेल्या चाहत्यांनी महेश भट्ट यांचा सडक 2 या चित्रपटाच्या ट्रेलरला डीसलाइक केलं आहे.