Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड पॉप सिंगर ‘TAZ’चे निधन; हृतिकसाठी गायले होते ‘इट्स मॅजिक’ गाणे

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील संगीत कलासृष्टीतून अतिशय दुःखद आणि मोठी बातमी समोर येत आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध पॉप सिंगर Taz याचे २९ एप्रिल २०२२ रोजी निधन झाले आहे. दरम्यान ते ५४ वर्षाचे होते. ही बातमी समजताच संगीत कला विश्वावर शोककळा पसरली आहे. सिंगर Taz’च्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री देखील धक्क्यात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. Taz यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. Taz’ यांनी आपल्या सुरेल कारकिर्दीत जॉन अब्राहाम आणि ह्रतिक रोशन यांसारख्या कलाकारांसाठी गाणे गायले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पॉप सिंगर Taz यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून फारशी बरी नव्हती. इतकेच काय तर ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोमामध्ये होते. अगदी काहीच दिवसांपूर्वी ते कोमामधून बाहेर आले होते. ज्यामुळे चाहते खुश होते. मात्र आज अचानक त्यांची निधनवार्ता समोर आल्याने संगीत सृष्टी हादरली आहे. माहितीनुसार, त्यांना हर्निया आजार झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच २ वर्षापूर्वी या आजारासंदर्भात त्यांच्यावर एक सर्जरी करणार होते मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. अखेर काळ आला आणि लाडक्या Taz’ला घेऊन गेला. Taz यांनी आपल्या गाण्यांनी भारतीय पॉप म्युझिक इंडस्ट्री गाजवली आहे. ‘नचांगे सारी रात’ या गाण्या व्यतिरिक्त ‘गल्लां गोरियां’ आणि ‘दारू विच प्यार’ ही त्यांची हीट गाणी आहेत.

Taz यांनी १९९० ते २००० या सालात आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लोकांना अगदी वेड लावलं होतं. Taz यांचे मूळ नाव तरसमे सिंग सैनी असे आहे. मात्र इंडस्ट्रीत आल्यानंतर त्यांना पॉप म्युझिक सिंगर Taz म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी हृतिक रोशनसाठी २००३ मध्ये ‘इट्स मॅजिक’ हे गाणे गेले होते. या गाण्याने सोहळे म्हणू नका कि पार्टी.. सगळीकडे धूम केली होती. आज सोशल मीडियावर Taz च्या निधनाची बातमी व्हायरल होताच अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहत हि कमी काढूच भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.