हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल आणि वाद यांचं गंभीर नातं आहे. रंगोली चंदेल इंडस्ट्रीत कोणाशी ना कोणाशी भांडत राहते आणि यामुळे अनेक वादही निर्माण होत असतात. या वेळी रंगोली चंदेलने एक नवीनच नाटक केले आहे,’कोणत्याही नायिकेने आपल्या बळावर १०० करोड़ बजटच्या चित्रपटाला हिट करू दाखवावे ,एखादी नायिका यामध्ये यशस्वी झाल्यास तिची बहीण कंगना बॉलिवूड सोडेल,असे आव्हान तिने बॉलीवूड मधील इतर नायिकांना दिले आहे.
ट्विटरवर रंगोलीने लिहिले आहे की, ‘माझे खुले आव्हान इंडस्ट्रीतील प्रत्येक मुलीला आहे, कंगनाशिवाय इतर कोणतीही नायिका स्वत: हून ६०-७०-८०-१०० कोटींच्या बजेट असलेल्या फिल्मला हिट बनवू शकते जर तू मला तुझे नाव सांगू शकशील तर कंगना तिचं करियर सोडून देईल. ‘
My open challenge to the industry can any girl in today’s time solo carry a film above 60-70-80-100cr budget other than Kangana….??? If you give me a legit name Kangana will stop acting forever …. 🙏
— Rangoli Chandel (@Rangoli_A) March 11, 2020
काही दिवसांपूर्वीच, ‘बागी ३’ चे दिग्दर्शक अहमद खान एका मुलाखतीत म्हणाले होते की, मणिकर्णिका ही दिग्दर्शकासाठी तोटा आहे कारण महिला मुख्य भूमिकेविषयी इतक्या मोठ्या बजेटवर चित्रपट बनवणे म्हणजे मोठा तोटा आहे. इतकेच नव्हे तर कंगनाच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटातही तोटा सौदा होईल असेही ते म्हणाले.
पण या मुलाखतीनंतर अहमद खानचा सूर अचानक बदलला आणि त्याने कंगनाची स्तुती करत कंगनासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले- ‘कंगना हि महिला बंडखोर बॉलीवूडची नायक आहे. अॅक्शन चित्रपट करणारी ती एकमेव मुलगी आहे. मला धाकडचा ट्रेलर खूप आवडला. कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे. जर तिने माझी स्क्रिप्ट मंजूर केली तर मी तिच्याबरोबर काम करायला आवडेल ‘.
यानंतर रंगोलीने अहमद खानला एका ट्वीटमध्ये चांगलेच सुनावले आणि सांगितले की तोही लाइनवर आला आहे.
कगना राणौतबद्दल सांगायचे तर,तिच्याकडे सध्या मोठे चित्रपट असून यावर्षी हे चारही चित्रपट यावर्षी रिलीज होतील. तिचा पहिला ‘धाकड’ चित्रपट ५ मे २०२० रोजी, जयललिताची बायोपिक ‘थलावी’ जूनमध्ये, ‘तेजस’ ऑक्टोबरमध्ये आणि ‘इमली’ नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होईल. तथापि, कोरोना विषाणूमुळे सरकारने चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले असून अनेक चित्रपटांच्या तारखांनाही पुढे ढकलले गेले आहे, त्यामुळे कंगना रनौतच्या चित्रपटाच्या प्रदर्शनातही बदल होऊ शकेल.