Take a fresh look at your lifestyle.

रणवीरच्या ‘जयेशभाई…’ची रिलीज डेट निश्चित…जॉन आणि विक्की कौशलच्या चित्रपटांना देणार टक्कर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । रणवीर सिंगच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली आहे. हा चित्रपट गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित होईल.या दिवशी जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होईल. याशिवाय विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’ हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होत आहे. अशा स्थितीत तिन्ही चित्रपटांमध्ये प्रचंड स्पर्धा होईल. दुसरीकडे फरहान अख्तरच्या ‘तूफान’ चित्रपटाची रिलीज डेटही बदलण्यात आली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. यापूर्वी त्याने रणवीर सिंगचा ‘जयेशभाई जोरदार’ २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याचा खुलासा केला होता. जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ आणि विक्की कौशलचा ‘सरदार उधम सिंग’ही त्याच दिवशी रिलीज होणार आहे.

 

 

 

याशिवाय तरण आदर्शने सांगितले की आदित्य चोप्रा (यशराज फिल्म्स) आणि रितेश सिधवानी (एक्सेल एंटरटेनमेंट) यांनी ठरविले आहे की ते वेगवेगळ्या तारखेला आपले चित्रपट प्रदर्शित करतील. ‘जयेशभाई जोरदार’ २ ऑक्टोबर २०२० आणि १८ सप्टेंबर २०२० रोजी ‘तूफान’ प्रदर्शित होईल. ‘जयेशभाई ..’ हा यशराजचा चित्रपट आहे

 

 

लेखक-दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित ‘जयेशभाई जोरदार’ हा गुजरातच्या पार्श्वभूमीवर आधारित एक मजेदार चित्रपट असून यात रणवीर गुजराती व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. यात बोमन इराणी रणवीरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.याशिवाय रणवीर सिंह ‘८३’ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरने यापूर्वी फिल्म इंडस्ट्रीचे टॉप फिल्ममेकर संजय लीला भन्साळी, रोहित सेट्टी, जोया अख्तर आणि कबीर खान यांच्यासोबत काम केले आहे.