Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांनी गाजवले इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल; पटकाविला मानाचा पुरस्कार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नुकतेच न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरते गाजविले आहे. या फेस्टिवलमध्ये त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका बजावलेल्या अनुपम खेर यांना आता न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ या मानांकित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘हॅपी बर्थडे’ या शॉर्टफिल्मसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अनुपम यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. इतक्या प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त होताना लिहिले आहे कि, ‘इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी मी न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आभार व्यक्त करतो. या फेस्टिवलमध्ये मला बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून निवडणे जाणे सन्मानाची बाब आहे. याचे संपूर्ण श्रेय हॅपी बर्थडेच्या संपूर्ण टीमला आणि माझी को-स्टार अहाना कुमराला जाते. दिग्दर्शक प्रसाद कदम, पटकथा लेखक, प्रॉडक्शन टीम व चाहत्यांचे आभार,’. हे ट्विट पाहिल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी व त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘हॅपी बर्थडे’ ही शॉर्टफिल्म सध्या संपूर्ण जगभर चांगलीच चर्चेत आहे. यात अनुपम खेर यांच्यासोबत अहाना कुमरा मुख्य भूमिकेत दिसत आहे. प्रसाद कदम यांनी ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली आहे. अनुपम व अहाना कुमार याआधी ‘ए अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये एकत्र दिसले होते. न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलध्ये ‘हॅपी बर्थडे’ या शॉर्टफिल्मला बेस्ट अ‍ॅक्टरसोबतच बेस्ट फिल्मचा अवॉर्डही प्राप्त झाला आहे. एकाचवेळी दोन पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण टीम सध्या आनंदात आहे. निर्माते गिरीश जौहर यांनीही याबद्दल आनंद व्यक्त केला.