Take a fresh look at your lifestyle.

अखेर… प्राणज्योत मालवली; ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार उर्फ मोहमद युसूफ खान यांचे आज सकाळी निधन झाले आहे. दरम्यान ते ९८ वर्षांचे होते. त्यांना मुंबईतील खार येथे असणाऱ्या पी डी हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना गेल्या अनेक दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू यांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केली होती. त्या प्रमाणे यानुसार दिलीप कुमार यांना रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज दिला होता. शक्य तितके सर्व शर्थीचे प्रयत्न करूनही दिलीप कुमार यांचा प्रवास अखेर आज थांबला आणि बॉलिवूडमधील एक पर्व संपले.

आज (७ जुलै २०२१) सकाळी पहाटेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांना पहिल्यांदा ६ जून २०२१ रोजी ऑक्सिजन सपोर्टवर रग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. या दरम्यान त्यांच्या निधनाच्या अफवाही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्या होत्या. तेव्हा दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत या अफवांचे खंडन केले होते. तसेच दिलीप कुमार यांना ११ जून २०२१ला डिस्चार्जदेखील देण्यात आला होता.

या दरम्यान अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर अस्थिर अश्या परिस्थितीत होती. शिवाय यांना गेल्या काही वर्षांपासून किडणीचा आणि न्यूमोनियाचा त्रास असल्याचे देखील समोर आले होते.प्रकृतीच्या तक्रारींमुळे दिलीप कुमार यांचा ९४वा वाढदिवस देखील हॉस्पिटलमध्येच साजरा करण्यात आला होता. दिलीप कुमार बॉलिवूड जगतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते होते. दिलीप कुमार यांनी भारतीय सिनेसृष्टीला एकापेक्षा एक असे अनेको गाजलेले चित्रपट दिले आहेत. यामध्ये नया दौर, मुघल ए आझम, देवदास, राम और शाम, अंदाज, मधुमती आणि गंगा जमुना या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच १९९८ साली त्यांनी किला हा शेवटचा चित्रपट केला होता.

दिलीप कुमार यांना १९९४ सालामध्ये दादासाहेब फाळके या उच्च व मानांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९८ सालामध्ये दिलीप कुमार यांना पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान ए इप्तियाझ’ या पुरस्काराने गौरवले होते. याशिवाय त्यांना २०१५ सालामध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. यासह २००० ते २००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यदेखील होते. आज दिलीप कुमार आपल्यात भले नसतील मात्र त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेले चित्रपटसृष्टीतील काम नेहमीच त्यांना आपल्यात जिवंत ठेवेल. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर सध्या शोककळा पसरली आहे. अनेको कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.