Take a fresh look at your lifestyle.

हायप्रोफाइल असल्यामुळे बॉलिवूड शिक्षा भोगतं; क्रूझ ड्रग्जप्रकरणी जावेद अख्तरांचा आर्यन खानला पाठिंबा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड मधून सगळ्यात जास्त गाजत असलेले एकच प्रकरण म्हणजे आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण. हे प्रकरण जितके सुटेल वाटते तितकेच आणखी गुंतताना दिसत आहे. आर्यन खान सुटणार म्हणताना त्याची कोठडी वाढतच जाताना दिसली. त्याच्या जमीन याचिकेवर एकदा नव्हे तर तब्बल दोनदा सुनावणी न देता पुढे ढकलण्यात आली आणि आर्यांची पुन्हा पुन्हा NCB च्या कोठडीत पाठवणी झाली. दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अनेक बॉलिवूडकरांनी आर्यनला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता बेधडक वक्तव्य ठेवणारे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीदेखील याप्रकरणी कुणाला टोला तर कुणाला समर्थन दिले आहे.

गीतकार जावेद अख्तर हे आपल्या स्पष्ट वक्तशीरपणासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ओळखले जातात. आता त्यांनी आर्यन खानला पाठिंबा देताना टीकाकरांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, ‘मी पोर्टवर पकडलेल्या १ डॉलर कोकेनबाबत एकही बातमी पाहिली नाही. मात्र १.३० लाख चरस गांजा पकडल्याची बातमी नॅशनल न्यूज होते’? यानंतर, आर्यन खानकडे गांजा सापडला नसतानाही त्याला सोडलं का जात नाही? असा प्रश्न अनेकवेळा विचारला जातोय. याबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले कि, ‘बॉलिवूड इंडस्ट्री हायप्रोफाईल असल्यामुळे बॉलिवूड नेहमीच शिक्षा भोगत आलं आहे. जेव्हा तुम्ही हाय प्रोफाइल असता त्यावेळी तुम्हाला खाली खेचण्यास तुमच्यावर दगडफेक करण्यास चिखलफेक करण्यास सर्वाना आनंद मिळतो.’ आता या वक्तव्यावर हे स्पष्टच होते कि जावेद अख्तर आर्यन खानला समर्थन देत आहेत आणि NCB ला लक्ष्य करून निशाणा साधत आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चर्चेत असतात. आताही त्यांनी आपल्या वक्तव्यातून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान याला निष्कारण लक्ष्य केलं जात असल्याचं बोलून दाखवलं आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी लांबलेली सुनावणी आज होणार आहे. त्यामुळे आज सुनावणी दरम्यान काय निकाल मिळेल? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.