Take a fresh look at your lifestyle.

आणखी एक स्वर तारा निखळला; सुप्रसिध्द गायक K K यांचे हार्ट अटॅकने निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी सिने इंडस्ट्रीतून येते. मुख्य म्हणजे केके यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले असून दरम्यान ते लाईव्ह कॉन्सर्टमध्ये होते. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांना त्वरित CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत काळाने घाला घातला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि स्वरांच्या दुनियेतील आणखी एक तारा निखळला.

वयाच्या ५३ व्या वर्षीच केके ने जगाचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा संगीत कला क्षेत्रात शोक निर्माण झाला आहे. केके यांनी आपल्या कारकीर्दीत हम दिल दे चुके सनम सारख्या लोकप्रिय चित्रपटातील तडप तडप हे गाणे प्रेक्षकांना दिले आहे. आजही या गाण्यातील प्रत्येक शब्द प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारा आहे. याशिवाय हम रहे या ना रहे कल, मेरी जा बेपनाह, सच केह रहा है दिवाना अशी गाणी देणारा कलाकार इंडस्ट्रीने गमावणे ही बाब अत्यंत वेदनादायी आहे.

 

 

लता दीदी, बप्पी दा आणि त्यानंतर आता के के यांचे निधन बॉलिवूड सिनेसृष्टीसह संगीत कला विश्वासाठी अत्यंत धक्कादायक आणि चटका लावणारी बाब आहे. हे नुकसान n भरून निघणार आहे अशी भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केली आहे.

केके यांच्या निधनाच्या बातमीने एकीकडे बॉलिवूड शोकाकुल अवस्थेत आहे. तर दुसरीकडे राजकीय क्षेत्रातून देखील दुःख व्यक्त केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत आपल्या संवेदना त्यांच्या मित्र आणि परिवारासह आहेत असे ट्विट केले आहे. शिवाय अमित शहा यांनीही शोक व्यक्त करणारे ट्विट केले आहे. याशिवाय सिने इंडस्ट्रीमधून अक्षय कुमार, मोहित चौहान, जावेद जाफरी, करण जोहर, अरमान मलिक यांसारख्या अभिनय आणि संगीत कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी सोशल मीडियावर शोक व्यक्त करीत आहेत.