Take a fresh look at your lifestyle.

“खैरियत भी पुछते नहीं, ना बात करते हों”; नेहा कक्करचं नवं गाणं ‘नाराझगी’ रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील अत्यंत लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिने अनेक अपयश पचवून यशाची अशी काई मुसंडी मारली कि आज बस नाम हि काफी है अशी परिस्थिती निर्माण केली आहे. नेहा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तर तिची गाणी नेहमीच सोशल मीडियावर ट्रेंडिग करताना दिसतात. यानंतर नेहाचं एक नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याचे नाव आहे नाराजगी. हे नवं गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झालं आणि अगदी काही तासांतच लोकांनी या गाण्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. शिवाय नेहाने देखील हे गाणे आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

नेहाच्या या नव्या गाण्याला अवघ्या दोन तासातच २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं लाईक केले आहे. या गाण्याला मिळालेली पसंती पाहून सगळेच भारावून गेले आहेत. दरम्यान एक हजाराहून अधिकांनी कमेंट करून गाण्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेहा कक्करने स्वत: या गाण्याच्या कमेंट बॉक्समंध्ये एक कमेंट केली आहे. “मला नेहमीचं अश्या प्रकारचं गाणं गायचं होतं आणि तसं गाणं मी गायलं आहे. मला आशा आहे की तुम्हालाही हे गाणं आवडलं असेल”, अशी हि कमेंट आहे.

नेहा कक्करच्या नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्याचे बोल “खैरियत भी पुछते नहीं, ना बात करते हों…” असे काहीसे आहेत. सोनल प्रधानने हे गाणं लिहिलं आहे तर म्युझिकही तिनेच दिलं आहे. शिवाय “खैरियत भी पुछते नहीं, ना बात करते हों”, असं म्हणत आपलं नाराजगी हे नवं गाणं रिलीज झालं आहे अशी सोशल मीडियावर गायिका नेहा कक्करने पोस्ट केली आहे. सोबत या गाण्याची एक झलकही तिने पोस्ट केली आहे. यावर एका यूजरने कमेंट्समध्ये म्हटलं कि, “नेहा तुझा आवाज मला नेहमीचं तुझ्या प्रेमात पाडतो. तु अशीच दर्जेदार गाणी गात राहा आणि मला तुझ्या प्रेमात पाडत राहा”.