Take a fresh look at your lifestyle.

अतिशय दुःखद..! भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्या अपघाती निधनामुळे हळहळले बॉलिवूडकर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशाचे भारतीय संरक्षण दलप्रमुख CDS बिपीन रावत यांचं ०८ डिसेंबर २०२१ रोजी एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. हि बातमी अतिशय दुःखद आणि शोकदायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगिरीच्या जंगलात त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये १४ जण उपस्थित होते. भारतीय हवाई दलाचं हे हेलिकॉप्टर वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांना घेऊन जात होते. दरम्यान या अपघातात बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका जखमीवर उपचार सुरु आहेत. बिपीन रावत यांच्या निधनामुळे सध्या संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. शिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या बातमीनंतर रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे.

अभिनेता कबीर बेदी, विवेक ओबेरॉय, कंगना रनौत, सोफी चौधरी यांसह लेखक रसूल पुकुट्टी यांनीदेखील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता कबीर बेदी याने ट्विट करीत लिहिले कि, “जनरल रावत यांच्या निधनाचं प्रचंड दु:ख होतंय. दोन आठवड्यांपूर्वीच दिल्लीत त्यांची भेट झाली होती. ज्यावेळी त्यांनी पोलो मॅचनंतर माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. त्यांच्याकडे पाहून मी फार प्रभावित झालो होतो.#IndianArmy RIP”.

तसेच अभिनेता विवेक ओबेरॉय याने ट्विट करीत लिहिले कि, “जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फार वाईट वाटतंय. सर, तुम्ही गेल्या ४ दशकांपासून ज्या पद्धतीने निस्वार्थपणे देशसेवा केली त्यासाठी आमच्या सगळ्यांचा तुम्हाला मानाचा मुजरा. देशातील सर्वोत्तम सैनिकांपैकी एक गमावल्यामुळे देश ज्या दु:खात बुडाला आहे. त्या शोकसागरात मी सहभागी आहे. RIP #ओमशांति”. “दु:खद…त्यांच्या आत्म्यास शांती लाभो..त्यांनी देशासाठी जे कार्य केलं त्याला मनापासून सलाम”, असं ट्विट लेखक आणि फिलममेकर रसूल पुकुट्टी यांनी केलं आहे.

अभिनेत्री कंगना रानौतने इंस्टाग्रामवर रील पोस्ट करत बिपीन रावत याना श्रद्धांजली वाहिली आहे. यात तिने लिहिले कि, संपूर्ण वर्षतिल अत्यंत भयानक अशी बातमी आहे हि. भारतीय संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे अश्या पद्धतीने दुर्दैवी मृत्यू होणे. खरंच देश तुम्ही केलेल्या निस्वार्थ सेवेसाठी तुम्हाला कायम लक्षात ठेवेल. ओम शांती.. हरी ओम.. बिपीन रावत Mi सीरिजच्या सुलुर या हेलिकॉप्टरने आर्मी बेसवरुन भरारी घेतल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून एका जखमीवर अजूनही उपचार सुरु आहेत.