हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । जगभरात कोरोनाव्हायरसवर लस विकसित करण्याचा प्रयोग संपूर्ण जगात चालू आहे. अमेरिकेच्या सिएटलमधील सेझर परमानेंट वॉशिंग्टन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोविड १९ या लसीची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. जेनिफर हॅलर नावाच्या एका महिलेने स्वतःवर या लसीच्या शॉटची टेस्ट करण्यावर सहमती दर्शविली आहे.जेनिफर हॅलरच्या निर्णयावर बॉलीवूड मधून प्रतिक्रिया आली असून जेनिफरच्या धैर्याचे कौतुक केले जात आहे. प्रसिद्ध बॉलिवूड लेखक आणि शायर मनोज मंताशीर यांनी जेनिफर हॅलरबद्दल एक ट्विट करुन तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
#JenniferHaller ने अपनी जान दाँव पर लगाकर #CoronaVirus की vaccine अपने ऊपर test की. दोबारा कभी औरत की हिम्मत पर शक मत करना. 🙌🙌🙌 pic.twitter.com/ElDIJUNC9I
— Manoj Muntashir (@manojmuntashir) March 18, 2020
शायर मनोज मंताशीर यांनी जेनिफर हॅलरसाठी ट्विट केले आहे, ‘# जेनिफर हॅलरने आपले आयुष्य धोक्यात घातले आहे आणि # कोरोनाव्हायरसच्या लसीची स्वत: वर चाचणी केली आहे. स्त्रीच्या धैर्यावर पुन्हा कधीही संशय घेऊ नका. अशा प्रकारे त्यांनी महिलांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार जेनिफर हॅलर एक ४३ वर्षीय ऑपरेशन मॅनेजर असून टेक कंपनीमध्ये काम करत आहे. कोरोनाव्हायरस पासून वाचण्यासाठी बनवलेल्या लसीची तपासणी सहा आठवड्यांत ४५ स्वयंसेवकांवर केली जाईल, ज्यात १८ ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. दुसरीकडे, जर आपण भारतात कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांबद्दल बोललो तर ही संख्या १४७ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १२२ भारतीय नागरिक आणि २५परदेशी नागरिकांचा समावेश आहे.