Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड जम्पिंग जॅक जितेंद्र यांचा ७९ वा वाढदिवस

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड जगतातील सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर अर्थात चाहत्यांचे लाडके जितेंद्र यांचा आज ७९वा वाढदिवस आहे. वयाच्या या टप्प्यावरही जितेंद्र काम करताना दिसतात. कधी रिऍलिटी शो मध्ये जज म्हणून तर कधी गेस्ट जज म्हणून ते दिसत असतात. आपल्या अनोख्या डान्समुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

jitendra1

 

जितेंद्र यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ रोजी पंजाब मधील अमृतसर येथे झाला. खरतर त्यांचे मूळ नाव रवी कपूर आहे. त्यांचे वडील अमरनाथ कपूर हे इमिटेशन दागिन्यांचे व्यापारी होते. जितेंद्र यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतील सेबेस्टन गोअन हाय स्कुल, गिरगाव येथून पूर्ण केले. दरम्यान अभिनेता राजेश खन्ना शाळेत त्यांचे वर्गमित्र होते. पुढे त्यांनी बारावी पर्यंतचे विद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथून केले. त्यानंतर के.सी. कॉलेज, मुंबई येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Jitendra with rajesh khanna

​जितेंद्र यांनी १९५९ साली ‘नवरंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अभिनय आणि आपल्या हटके डान्स स्टाइलने त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांच्या मनावर जादू करणारे जितेंद्र प्रेक्षकांसाठी कधी जितू झाले ते कळलेच नाही. मनमानावर राज्य करणारे जितेंद्र त्यांच्या हटके डान्स स्टाइलमुळे जम्पिंग जॅक म्हणून ओळखले जाऊ लागले. जितेंद्र यांना २०१४ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Jeetendra-receiving-Dada-Saheb-Falke-Award

जितेंद्र यांचा विवाह १९७४ साली शोभा यांच्याशी झाला. त्यांना एकता कपूर आणि तुषार कपूर ही दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांनी सिनेसृष्टीत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तुषार कपूर अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. तर एकता कपूर बालाजी फिल्म प्रॉडक्शनची क्रीएटिव्ह हेड आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.