Take a fresh look at your lifestyle.

छोट्या क्षणांना भरभरून जगायला शिकवणाऱ्या ‘बोनस’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशीत

निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार हे चित्रपट चाहत्यांसाठी ‘बोनस’ हा आणखी एक चित्रपट रुपेरी पडद्यावर सादर करायला सज्ज झाले आहेत. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि ‘जीसिम्स’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले आहे. या चित्रपटात मराठीतील कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर आज प्रकाशीत करण्यात आले.

चित्रपटाच्या आज प्रकाशित झालेल्या पोस्टरवरून या चित्रपटाकडून काय अपेक्षित केले जाऊ शकते, याचा आडाखा बांधता येतो. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे कलाकार या चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत असून हा चित्रपट रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. हे दोघेही या पार्श्वभूमीवर अगदी रोमँटीक अशा पोजमध्ये उभे आहेत. त्यातही वेगळी भासते ती गश्मीरच्या हातातील सूटकेस. या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्याशिवाय अत्यंत ग्लॅमरस अशी गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत असल्यानेही या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

WhatsApp Image 2020-01-09 at 4.58.48 PM

‘बोनस– वॉर्ड फॉर ऑडेसिटी’ या चित्रपटाची संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चा आहे ती या चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांमुळे. गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकेट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले.पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर अशा नायिकांपैकी एक आहे. तिच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत दगडी चाळ, वृदांवन, पोश्टरबॉइज, लपाछपी, जंगली या चित्रपटांचा समावेश असून त्यांतील तिच्या मध्यवर्ती भूमिका गाजल्या आहेत.गश्मीर महाजनीने त्याच्या इन्स्टाच्या अकाऊंटवर चित्रपटाचा पोस्टर पोस्ट केला आहे.