Take a fresh look at your lifestyle.

.. ह्याचे चित्रपट बॉयकॉट करा रे; ‘मुघल खरे राष्ट्रनिर्माते होते’, म्हणणाऱ्या दिग्दर्शक कबीर खानवर नेटकरी संतापले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बजरंगी भाईजान हा अत्यंत लोकप्रिय झालेला चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केला ते दिगदर्शक कबीर खान थोडे अस्वस्थ आहेत. त्याचे कारण त्यांनी स्वतःच सांगितले आहे. ‘मुघल राज्यकर्ते हे खरे राष्ट्रनिर्माते होते. मात्र, हिंदी चित्रपटांत मुघल राज्यकर्त्यांचे केले जाणारे राक्षसी आणि खलनायकी चित्रण पाहणे नकोसे वाटते. किमान संशोधन करून मुघलांचा इतिहास मांडा. केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी मुघलांचे खलनायकी चित्रण केले जाते आणि त्यासाठी कुठलाच ऐतिहासिक पुरावा पाहिला जात नाही. त्यामुळे हे पाहणे खूप त्रासदायक आणि अस्वस्थ करणारे आहे. या वक्तव्यानंतर भले कबिरची अस्वस्थता मिटली असेल पण आता नेटकऱ्यांचा संताप विकोपाला गेलाय आणि परिणामी कबीरच्या वक्तव्याचे पडसाद ट्विटरवर पाहायला मिळत आहेत. कबिरच्या चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करू लागले आहेत.

दरम्यान बॉलिवूड हंगामा या माध्यमाशी बोलताना दिग्दर्शक कबीर खान म्हणाला होता कि, एखाद्या चित्रपट निर्मात्याने संशोधन केलेले असते किंवा चित्रपट निर्मात्याला एखादा मुद्दा मांडायचा असतो तेव्हा मी समजू शकतो. पण मग तुम्हाला मुघलांना कोणत्याही दृष्टीने खलनायक म्हणूनच प्रेक्षकांसमोर सादर करायचे असेल तर त्यासाठी आधी काही विशेष संशोधन करा आणि मग ते खलनायक होते हे सर्वांना पटवून द्या. खरंतर, मुघल राज्यकर्ते हे मूळ राष्ट्रनिर्माते होते. पण त्यांनी खून केले, त्यांनी जनतेचा छळ केला असे म्हणणे किंवा त्या आधारावर त्यांचा इतिहास रचून लिहिणे यासाठी कोणता आधार घेत आहात.

या सर्व लिखाणासाठी कोणतेतरी ऐतिहासिक पुरावे पहा. इतिहासकारांसोबत विविध प्रश्नांवर खुली चर्चा करा. पण केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी असे काहीही करू नका. भारताच्या इतिहासात वेगवेगळ्या कालावधीत होऊन गेलेल्या मुघल आणि इतर मुस्लीम शासकांना कमी लेखण्याचं काम आज फार सोप्प आहे. मला असं कथानक असणाया चित्रपटांबद्दल आदर वाटत नाही. अर्थात हे माझं स्वत:चं वैयक्तिक मत आहे.

परंतु कबीर खान याच्या वक्तव्यामुळे अनेक नेटकरी नाराज तर अनेक जणांचा संतापाचा बांध फुटला आहे. यामुळे नेटकाऱ्यानी कबीर खानची चांगलीच कानउघाडणी करत अनेको ट्विट केले आहेत. सध्या सोशल मीडियावर कबीर खान चांगलाच ट्रोल होतोय. अनेकांनी त्याला फैलावर घेत कबिरच्या आगामी चित्रपट बॉयकॉट करण्याची शपथ घेतली आहे.

यात एका नेटकाऱ्याने असे लिहिले कि, निर्माता दिग्दर्शक कबीर खान यांनी सांगितले की मुघल हे खरे राष्ट्र निर्माते होते. त्यांनी मंदिरे पाडून टाकली, हिंदूंना मुस्लीम बनवले आणि तुम्ही म्हणता की ते राष्ट्रनिर्माते होते. त्याला काही धडे शिकवा आणि त्याचे चित्रपट बायकोट करा