Take a fresh look at your lifestyle.

बॉयकॉट ‘लाल सिंग चड्ढा’ ट्रेंडिंगवर; अखेर आमिर- करीनाने मौन सोडत केली प्रेक्षकांना ‘ही’ विनंती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होऊ घातला आहे.

पण या चित्रपटाचं दुर्दैव असं कि, रिलीजआधीच हा चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

‘हॅशटॅग बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ प्रत्येक सोशल मीडियावर हा हॅशटॅग दिसतो आहे. हा विरोध का आणि कशासाठी यापेक्षा विरोध होतोय हे कलाकारांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे आमिरने या निदर्शनांबद्दल दु:ख व्यक्त केलंच शिवाय करीनानेही आपलं मत मांडलं आहे.

अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ या ट्रेंडवर प्रेक्षकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान आमिर म्हणाला कि, ‘जेव्हा लोक बॉलिवूड आणि लाल सिंग चड्ढावर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं.

विशेषत: जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात, कारण त्यांना वाटतं की मी अशा लोकांच्या यादीत आहे ज्यांना भारत आवडत नाही. पण हे खरं नाही. काही लोक असा विचार करतात हे दुर्दैवी आहे. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. तो थिएटरमध्ये जाऊन एकदा पहा.’

अभिनेत्री करीना कपूरने नेटकऱ्यांना तिच्या चित्रपटाला विरोध न करण्याची विनंती करीत म्हटले आहे कि, ‘कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. तो चित्रपट आधी थिएटरमध्ये जाऊन पहा. आजच्या काळात प्रत्येकाचं मत वेगळं असतं. आज प्रत्येकाला आपला आवाज आहे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे आता असं होणार असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकावं लागेल.

अन्यथा तुमचं जगणं कठीण होईल आणि म्हणूनच मी अशी कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही. मला जे पोस्ट करायचे आहे ते मी पोस्ट करते. जर तो चांगला चित्रपट ठरला तर मला खात्री आहे की तो इतर कोणत्याही गोष्टीला (विरोधाला) मागे टाकेल आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास आहे.